कळंब दि.२३ वार बुधवार रोजी हासेगाव ईटकुर पारा या रस्त्यासाठी शिवसेना ( ठाकरे गट )यांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हासेगाव, ईटकुर, पारा प्र.ति.मा क्र.15 हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे सहा दुचाकी स्वरास आतापर्यंत आपला जीव गमवावा लागलेला आहे व अनेक जण जखमी झाले आहेत.
हा रस्ता सोलापूर हायवे व औरंगाबाद हायवे या रस्तेला जोडल्यामुळे या रस्त्यावर खूप वर्दळ असल्याकारणाने या रस्त्यासाठी आमदार आणि खासदार निधीतून या रस्त्यासाठी मंजूर असलेल्या 9 कोटी 30 लक्ष रुपये या कामास राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवून तात्काळ काम चालू करावे यासाठी शिवसेनेच्या वतीने या भागातील विविध गावातील नागरिकांनी आज ईटकुर बस स्थानक येथे रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख भारत सांगळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण अडसूळ, विभाग प्रमुख दत्ता सावंत, बाळासाहेब गंभीरे, प्राध्यापक दिलीप पाटील, मालोजी पाटील, हिंदविजय बावळे, रामचंद्र चोरघडे, पोपट आडसुळ ,बबलू अडसूळ, अशोक आडसुळ, पवन सावंत व असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच तहसील प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी दीड तास चाललेल्या रस्ता रोको मुळे अनेक प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे व आबालवृद्धांची हेळसांड झाली. आंदोलनानंतर तहसील प्रशासनाचे कर्मचारी यांनी विनंती करून निवेदन स्वीकारले व आंदोलन स्थगित केले.
0 Comments