कळंब - कळंब तालुक्यातील ईटकुर या ग्रामीण भागातील दादासाहेब विजयकुमार अडसूळ या तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या २०२१ च्या मुख्य परीक्षेत यश संपादन केल्यामुळे ईटकुर गावकऱ्याकडून त्याचा नागरी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या २०२१ च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ईटकुर येथील दादासाहेब विजयकुमार अडसूळ याने घवघवीत यश मिळवलं आहे.
एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसटीआय परीक्षेचा निकाल लागला. यात दादासाहेब याने घवघवीत यश मिळवलं. २०२१ ला दादासाहेब अडसूळ यांनी ही परीक्षा दिली होती. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेसाठी वर्ष-वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. पण काहींना परिस्थितीने एवढं हिम्मतवान बनवलेलं असतं की ते काही केल्या हरत नाहीत. हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
या नागरी सत्काराच्या वेळी ग्रामपंचायत इटकुर मधील सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी व हितचिंतक यांचीही उपस्थित होती.
0 Comments