कळंब - सनातनी वृत्तीच्या राजकर्त्याकडून संविधानाची खिल्ली उडवली जात असून लोकशाही आणि संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच रोखण्यासाठी संविधानाचा जागर घालण्याचा स्तुत्य उपक्रम प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्था करत असल्याचे प्रतिपादन साह्य. धर्मदाय आयुक्त एस.पी. पाईकराव यांनी संविधान सप्ताहच्या समारोप प्रसंगी केले.
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने संविधान सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
या सप्ताहादरम्यान भैरवनाथ अध्यापक विद्यालय,छत्रपती शिवाजी महाविद्यालय, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची संविधान ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती.
एकशे तीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. त्यापैकी मुक्ताई गुणवंत देशमुख प्रथम, वेदिका दीपकराव कुलकर्णी द्वितीय,प्रीती विक्रम पांचाळ तृतीय या विद्यार्थ्यांनी बाजी मारत सावित्रीबाई फुले विद्यालयाची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली असल्याने विद्यालयातील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून विरंगुळा केंद्रात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान सप्ताह समारोप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. त्र्यंबक मनगिरे यांनी संविधानामुळे सर्व भारतीयांचे हक्क, अधिकार सुरक्षित असल्याने संविधाना प्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. तर प्रमुख पाहुणे तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून संविधानामुळेच या पदावर येण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले.
यावेळी पत्रकार मंगेश यादव यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अँड.पि.डी. देशमुख, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री.काकडे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक एस.डी.अग्रीहोत्री, निरीक्षक एस.एच.क्षिरसागर, लिपिक एस.के.राजगुरू, लेखापाल बाळासाहेब गंगावणे,सेवक यु.एस.शिंदे हे प्रमुख पाहुणे होते तर ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, डॉ. शंकर कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर.घाडगे, ओबीसी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष भोजने, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक लक्ष्मण मोहिते, प्रा.सूर्यभान सोनवणे,प्रा सुरेश धावारे, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, शहराध्यक्ष नागेश धिरे,ज्येष्ठ नागरीक संघ जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव अडसूळ महाराज, सेवानिवृत्त शिक्षक डी.डी.गायकवाड, प्रमोद ताटे, आरपीआयचे मुकुंद मामा साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक विभागाचे भाऊसाहेब कुचेकर, अजय आवटे, सुरज गायकवाड, सागर पट्टेकर, इंजि.मयुर गायकवाड, इंजि.रोहन कसबे, शुभम गायकवाड आदि सह नागरिक, महिला, पुरुष व मुले-मुलींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी संविधानातील प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबुद्ध रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश घोडके यांनी तर आभार ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी मानले.
0 Comments