जव्हार - तालुक्यातील रामनगर येथे युवकांच्या पुढाकारणे दुसऱ्या सांस्कृतिक कला महोत्सवाचे अध्यक्ष राजेश खोटारा यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पा व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात पार पडला.
या महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा मा.महिला व बालकल्याण सभापती गुलाबताई राऊत व जनजाती विकास मंचाचे कोकण प्रांताध्यक्ष नरेश मराड यांची उपस्थिती विशेष ठरली.
महोत्सवाची सुरुवात करताना कासटवाडी ग्रामपंचायतीचे स्थानिक लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या हस्ते गावातील प्रती कुटुंबाला झाडूंचे वाटप करून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण गाव स्वच्छता अभियान राबवून सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर दोन वर्षापूर्वी युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने सुरुवात करून दिलेल्या महिलांच्या हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन करून गावातील नारी सक्तीचा सन्मान म्हणून हळदीकुंकू कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कासटवाडीच्या उपसरपंच सुलोचनाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली.
या एकदिवसीय महोत्सवात स्थानिक महिलांसाठी सुई दोरा पोवणे, चमचा गोटी व नेमबाजी यासारखे मनोरंजनीय खेळांचे आयोजन करून प्रथम तृतीय व तृतीय क्रमांक आलेल्या महिलांना पारितोषिके देण्यात आली. तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात बाल कलाकारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाट मोकळी करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कलावंतांनी आपला सहभाग नोंदवून शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी या कलावंतांच्या कलेला प्रोत्साहित केले.
स्थानिक कलाकार व इतर गाव असे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभाजन करून बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
या महोत्सवात जव्हार पंचायत समितीचे मा.सदस्य विनायक राऊत, ग्रामपंचायत सदस्य नितीन चौधरी, कल्याणी राऊत, बाळू भोये, कुणाल सापटा, नितीन टोकरे, त्र्यंबक रावते त्याचप्रमाणे जनजाती विकास मंचाचे सदस्य विकास कनोजा, दिपक काकरा यांनी सुद्धा या महोत्सवात आपली उपस्थिती लावली.
या महोत्सवाचे सूत्रसंचालन सचिव प्रमोद शेंडे यांनी केले तर महोत्सव यशस्वीतेसाठी महोत्सवाचे उपाध्यक्ष गोविंद माढा सदस्य विलास काकरा, सुधीर खोटरा, रमेश खोटरा, विशाल शेंडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments