उस्मानाबाद - महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई च्या उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आलेली होती, या नवनिर्वाचित निर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार व पदग्रहण कार्यक्रम नुकताच उस्मानाबाद येथे समारंभ पूर्वक पार पडला.
यामध्ये उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी प्रा. सोमनाथ लांडगे, जिल्हासचिव पदी प्रा. मनोज भारतराव डोलारे, जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनील जनार्दन बुटे, प्रशांत शहाजी अडसुळे, गणेश महादेव एडके, कोषाध्यक्ष पदी प्रा. बालाजी नामदेव काकडे, सहसचिव पदी किरण दत्तात्रय बनसोडे, प्रवक्ता पदी प्रभाकर बाजीराव डोंबाळे, तर जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी रघुवीर धोंडीबा घोडके, सुनील साधुराम लिके, अजित तुकाराम गायके यांची निवड करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार करण्यात आला.
या सोबतच मेडिकोस जिल्हाध्यक्षपदी डाॅ. संतोष पाटील, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ. अशोक शिंपले, जिल्हा सचिव पदी नवनाथ काकडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ. सुमित पालवे व लोहारा तालुकाध्यक्ष पदी बाळू देवकर यांची निवड करण्यात आली आहे. सर्वांचेच या वेळी अभिनंदन करण्यात आले .
0 Comments