जव्हार: केंद्र स्तरीय १० जिल्हा परिषद शाळांची एक दिवसीय शालेय क्रीडास्पर्धा मोहाचा पाडा येथे पार पडल्या.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा यांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून झाप ग्रामपंचायत कडून विजेता संघ व उप विजेता संघाला, वैयक्तिक स्पर्धकाला देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी झाप सरपंच एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की लहान स्पर्धेतून च खेळाडू घडत असतो.
या वयातच खेळाडूला आपल्या कलागुणांना वाव देत येतो आणि विद्यार्थ्याचे मनोबल वाढावे व आपण स्पर्धा जिंकलो आहोत याचे काहीतर प्रतीक म्हणून आम्ही या वर्षी विजेत्याला ट्रॉफी दिल्या आहेत.
दरवेळी या स्पर्धा आयोजित होतात परंतु जिंकलेल्या संघाला काही बक्षीस म्हणून दिले जात नव्हते त्यामुळे विद्यार्थ्याला तोंडी सांगावे लागत होते की आम्ही जिंकलो म्हणून आम्ही या वर्षी हा निर्णय घेतला.
यावेळी मोहाचा पाडा केंद्राचे केंद्र प्रमुख शेंडे , शिक्षक वाघ, खाले व सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक , नांदगाव उप सरपंच कैलाश गांगड,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी,संतोष भला, माजी सरपंच संजय भला, काशिनाथ दरोडा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय वारा , व खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments