खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

कोतीमाळ घाट बनलाय धोकादायक वाहन चालकांना करावी लागते कसरत; घाटात कित्तेक जणांनी गमावले आपले प्राण मात्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

जव्हार - तालुक्यातील पिपंळशेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोतीमाळ गावाजवळील घाट व रस्ता खूप घराब झालेला असून, हा घाट तीव्र चढाण, जाग्यावर वळणदार, रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळे आणि वाहन चालकांना घाटाचा अंदाज न येत असल्यामुळे हा घाट दिवसेंदिवस अपघाताचे केंद्र बनत आहे.
कोतीमाळ पिंपळशेत हा रस्ता अनेक गाव, पाडे, वाड्या वास्त्यांना जोडणारा मार्ग असून, या भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळादेखील आहेत. 

या रस्त्याच्या मार्गाने रोज नागरिक ये-जा करत असतात. कोतीमाळ या घाटाची डागडुजी न झाल्यामुळे हा घाट धोकादायक बनलेला आहे. त्याचा या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो आदिवासी बांधवांना, विद्यार्थ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवख्या वाहण चालकांना तर घाटाचा आणि पडलेल्या काढ्याचा कोणताच अंदाज येत नसल्या मुळे अपघाताला आमंत्रण द्यावे लागत आहे.
या घाटात आज पर्यत अनेक नागरिकांचा अपघाताने बळी घेतलेला आहे. कित्तेक जण अपघात ग्रस्त झालेले आहे आणि त्यांना दुखापत झालेली आहे. मात्र या असा गंभीर बाबी कडे ना प्रशासनाच ना लोकप्रतिनिधीचं लक्ष. या खराब रस्त्याबाबत व घाटा बाबत वेळोवेळी प्रसारमाध्यमातून बातम्या येत असतात. तसेच नागरिकांच्या निवेदनातून निदर्शनास आणून देवून देखील गेंड्याच्या कातडीचे आणि झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नाही. या कडे गंभीर्याने लक्ष देवून ह्या कोतीमाळ घाटात पडलेले खड्डे व खराब रस्ता लवकरात लवकर बनवावा, नाहीतर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडले जाईल असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools