जव्हार - तालुक्यातील जिल्हा परीषद गट कौलाळे, झाप व नांदगाव येथे एकदिवशीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेचे अध्यक्ष तसेच झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथजी दरोडा यांनी उद्घाटन केले व शर्यतीला सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा विषय आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत होत आहे. मधल्या काळात बैलाचा छळ होतो म्हणुन त्यावर कोर्टाने बंदी घातली. तसेच बैलांवरील लम्पी वायरसमुळे देखिल हा खेळ थांबवला होता. परंतु तालुक्यातील पंचायत समितिच्या पशुधन विकास अधिकारी यांची परवानगी घेऊन शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. तसेच २०१७ मधे विहीत केलेल्या नियम व अटी यांच्या अधिन राहुन बैलगाडा शर्यत अखेरीस महाराष्ट्रभर सुरु ठेवल्या आहेत.
याचेच औचित्य साधुन झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी १२ फेब्रुवारी रोजी जव्हार तालुक्यातील जिल्हा परीषद गट कौलाळे, झाप व नांदगाव येथील गारादेवी मैदानावर एकदिवशीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. रविवारचा दिवस असल्यामुळे बहुतेक स्पर्धक हे नाशिक जिल्ह्यातुन येणार होते म्हणुन शर्यतीला विलंब झाला. तरी त्यांचं आगमणाची वाट बघत दुपारी १ वाजत जव्हार व मोखाडा येथील एकून ८ स्पर्धकांनी आपली नोंदनी केली.
पहीली शर्यत ही २ वाजुन २० मिनीटांनी पार पडली यात मोखाडा तालुक्यातील मडक्याची मेट यांच्या बैलजोडीने अवघे ३०० मिटर अंतर २९ सेकंदामधे कापत विजय साजरा केला व पहीला विजय आपल्या नावे नोंदवला. त्यानंतर संध्याकाळ पर्यत हा खेळ चालूच होतो. जवळपास शंभर च्या आसपास स्पर्धक आले होते तर हजार च्या आसपास प्रेक्षकांनी स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. यात विशेष कौतुकाची बाब म्हणजे रविवार असल्यामुळे नोकरदार वर्ग देखील शेती सोबत आपली नाळ कायमच जोडलेली आहे असे प्रत्यक्ष हजर राहुन दाखवुन दिले. व शर्यतीचा आनंद लुटला.
खरंतर त्र्यंबक, घोटी व इगतपुरी या परिसरात शर्यतीला संध्याकाळी ४ वाजता सुरुवात होते. यास्तव त्या परिसरातील शौकिनांनी अगदी उशिरा आपली उपस्थिती नोंदवली. तरी देखील पुढच्या वर्षी आपण योग्य नियोजन करून सकाळ पासुनच शर्यतीला सुरुवात करू असे मत आयोजक किशोर जाधव, लक्ष्मण भावर, हेमंत जाधव, योगेश वारघडे, विलास वाढु यांनी व्यक्त केले. या वेळी एकदिवशीय शर्यत असल्यामुळे पवारपाडा, झाप व नांदगाव सोबतच मोखाडा तालुका मधिलही शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने आनंद लुटण्यास एकवटले होते. या स्पर्धेत नांदगाव येथील नारायण करणोर, नरेश लोणे, तुकाराम बाजगीर, मनोज वाघमोडे यांनी देखील विशेष सहकार्य करून पंचांची भुमिका साकारली.
या वेळी स्पर्धेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी सांगितले कि
बैलगाडी शर्यत हा शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा खेळ असून तो आम्ही त्यांचा छंद जोपासण्यासाठी आयोजित करतो.या खेळात बैलांचे प्रदर्शन होते त्यामुळे बैल जोडीला योग्य भाव मिळतो तसेच भविष्यात अजूनही आपल्या जव्हार तालुक्याचे नाव कसे होईल यासाठी प्रयत्न राहील. तसेच आपला भविष्यामधे कोकणात एक नंबर च्या स्पर्धा करण्याचा प्रयत्न राहील" असे दरोडा यांनी ठामपणे प्रेक्षक वर्गाला आश्वासन दिले.
या वेळी त्यांच्या सोबत संजय भला बहुजन विकास आघाडी कौलाळे गण अध्यक्ष उपस्थित होते. भला यांनी या स्पर्धेत समालोचकाचं काम हाती घेऊन संध्याकाळ पर्यंत जमलेल्या हजार प्रेक्षकांना धुराळ्यात जाग्यावर खिळवुन ठेवन्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. अशा प्रकारे गारादेवी मैदावरती अध्यक्ष एकनाथ दरोडा, व आयोजक किशोर जाधव, हेमंत जाधव, लक्ष्मण भावर, योगेश वारघडे व विलास वाढु यांच्यामुळे थरारक बैलगाडी शर्यतीचा आनंद प्रेक्षकांना लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली. या सर्व आयोजकांनी मागिल दहा दिवसांपासुन शर्यतीची नियोजन बद्ध आखणी केली होती. शिवाय सुसज्य मैदान देखील साकारले होते. सर्वांचे परीसरातील नागरीकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
0 Comments