जव्हार - पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या जव्हार शहरातील बौद्ध वाडा या परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष पासून रहिवासी राहत असून त्यांच्या नावे अद्याप जागा व घराची मालकी मिळत नसल्याने, येथील नागरिकांना रहिवासी जागा नियमित करून प्रत्येक रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे या साठी चर्मकार समाज राज्य समितीचे सदस्य विनित मुकणे यांनी पुढाकार घेवून त्यांच्या शिष्ट मंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार येथील विश्रामगृह येथे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची सोमवारी दुपारी ४ वाजता भेट घेत निवेदन देवून मागणी केली.
मुकणे यांनी याबाबत माहिती घेत या नागरिकांना न्याय मिळावा म्हणून रूपरेषा आखली, त्या प्रमाणे जिल्हाधिकारी बोडके यांच्याकडे विषय मांडला असून जिल्हाधिकारी यांनी देखील सकारात्मकता दाखवीत मुकणे यांच्या शिष्ट मंडळाला उपलब्ध व आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
एकंदरीत गेल्या अनेक पिढ्यांपासून ही समस्या असून येथील नागरिकांना घरे बांधताना कोणत्याही प्रकारे बँक कर्ज मिळताना प्रॉपर्टी कार्ड चा अडथळा निर्माण होत असून ती समस्या सुटावी अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
पालघर जिल्हा प्रतिनिधी - इमरान कोतवाल
0 Comments