जव्हार-- भगिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठाना मार्फत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठण येथिल मुख्याध्यापिका कल्पना संतोष मुकणे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबददल राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम विरार येथिल वर्तक सभागृह येथे बहुसंख लोकांच्या उपस्थित संपन्न झाला
यापुर्वी देखील कल्पना मुकणे यांना माऊली शिक्षण प्रसारक मंडळ वाड़ा, सावित्रीबाई फुले समाजरत्न पुुरस्कार, "सावित्रीच्या लेकी" आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे
त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन समाजातफै युवा उद्योजक श्री विनीत मुकणे व इतर जेष्ठ मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
कल्पना मुकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना हा सन्मान माझा नसुन सर्व समाजातील भागिणीचा आहे.
त्यांची शाळा जव्हार तालुक्यातुन आदर्श शाळे साठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच शाळा I S O करण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.
पालघर जिल्हा प्रतिनिधी - इमरान कोतवाल
0 Comments