जव्हार : गरदवाडी येथील मोहन हरीचंद्र कडू यांचे अवकाळी पावसाच्या वादळीवाऱ्या मुळे घराचे छप्पर पूर्ण उडविले.
आज मंगळवार हा ग्रामीण भागातील आदिवासी समाज मोडा पाळतात, त्यामुळे मोहन कडू यांचे मुलासह वास्तव्य आज घराबाहेर होते त्यामुळे जीवित हानी टळली, त्यांचे घराचे छप्पर सिमेंट पत्रे पूर्ण खाली कोसलळे व त्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असून, मोहन कडू यांचा घराचा तात्काळ पंचनामा करून तलाठी यांना निवेदन देऊन पाहणी करून तातडीची मदत मागितली आहे.
परंतु गरीब कुटुंबाच संसार वाऱ्याने उघड्यावर पडला आहे त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख श्री. विनायक राऊत व लोकनियुक्त सरपंच श्री. कल्पेश विनायक राऊत यांनी त्यांना लगेच तातडीची मदत म्हणून त्यांचे घराचे झालेल्या संपूर्ण पत्रे देऊन कडू कुतुबियांना आर्थिक मदत केली .
या प्रसंगी ग्राम.सदस्य त्रिंबक रावते, नामदेव खिरारी, पप्पू होळकर, प्रकाश कवदरे, शंकर इल्हात, यशवंत इल्हात, भालचंद्र शिंदे उपस्थित होते त्यामुळे ग्रामस्थांनी सगळ्यांचे आभार मानले.
0 Comments