महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील पदभरतीबाबतचा शासन निर्णय क्रमांक काआआ-२०१७/प्र. क्र. २३३/कामगार -८ मागे घेण्याबाबत रद्द करण्या बाबत
संभाजी ब्रिगेड पालघर जिल्हाच्या वतीने हुतात्मा चौक, पाच बत्ती पालघर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व शिंदे फडवणीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय घेत आहात. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आपण दिनांक १४ मार्च २०२३ तारखेला काढलेला सेवा पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय क्रमांक काआआ-२०१७/प्र. क्र. २३३/कामगार -८ हा होय गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे आपण अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहात
आपण काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे असे आम्हास वाटत .
या आपल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन आपण दिनांक १४मार्च २०२३ रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या भरतीचा पदभरतीचा निर्णय शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व आपले शासन जबाबदार राहील असे प्रतिपादन पालघर येथील धरणे आंदोलनातून संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील यांनी केले.
या वेळी विभागीय संघटक नवसू नाना पाटील यांनी ही संबोधित केले.
यावेळी प्रमुख उपस्थित पालघर जिल्हाध्यक्ष पश्चिम सुधीर गायकवाड, पालघर जिल्हाध्यक्ष पूर्व तेजस भोईर, नवंनित्यानंद सरस्वती, पालघर जिल्हा सचिव किरण माळी, पालघर जिल्हा संघटक सुनील मोरे, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना जिल्हाध्यक्ष संजय पाटील, विक्रमगड तालुका अध्यक्ष प्रकाश भोये, वाडा तालुका अध्यक्ष शैलेश आंबवने व पालघर जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments