जव्हार : पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून मंगळवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जव्हार शहरातील श्रीराम मंदिर येथे जनसंवाद अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन जव्हार पोलीस ठाण्याच्या विद्यमाने करण्यात आले होते.
आता पर्यंत केवळ पोलिसी खात्या बाबत नागरिक परिचित होते, परंतु खाकितून जीवनदान देण्याचे काम करत जव्हार तालुक्यात खाकिने माणुसकी जपली आहे.
जव्हार तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातून सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांची अक्षरशः रीघ लागली होती, केवळ मानवी शरीरात तयार होणाऱ्या रक्ताने मानवाचे प्राण वाचू शकतात या जाणिवेतून जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी सुयोग्य नियोजन करीत पतंगशहा उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथील रक्तपेढी व ठाणे येथील लोकमान्य रक्तपेढी यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले
या वेळी 234 रक्तदात्यांनी रक्तदान करून खाकीच्या जनसंवाद अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिराला सुरुवात होताच पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव यांनी प्रथम रक्तदान केले या प्रेरणातून इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रेरित होऊन रक्तदान करायला सुरुवात केली यासाठी संपूर्ण जव्हार तालुका शहर युवा वर्ग व विद्यार्थ्यांनी सहकार्य करून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.पत्रकारांनी देखील या वेळी रक्तदान केले.
यावेळी जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी जव्हार व ठाणे येथील रक्तपेढी यांचे अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे या रक्तदान शिबिराला मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले. नागरिकांनी देखील या चागल्या उपक्रमाचे कौतुक केले.
0 Comments