जव्हार : जव्हार तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून ईदगाह मध्ये ईद ची नमाज अदा करण्याकरिता मोठ्यांपासून ते छोट्या पर्यंत सर्व बांधवांनी एकत्र येऊन ईद ची नमाज अदा केली.
नमाज अदा झाल्यानंतर बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत एकमेकांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम हा संदेश देत आपल्या संपूर्ण देशात हिंदू मुस्लिम एकतेचे संदेश देत रमजान ईद साजरी करण्यात आली .
ह्या सणानिमित्त जव्हार पोलीस स्टेशन निरीक्षक सुधीर संखे, जितेंद्र आहेरराव, केलास राठोड, खादे गणेश रज पुत यांनी जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवाना गुलाबाचे फुल देत ईद च्या शुभेच्छा दिल्या.
आश्या आनंदमय आणि शांततामय वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली.
0 Comments