जव्हार : दिनांक 28 एप्रिल जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा सारसुन तालुका जव्हार येथे रोटरी क्लब ऑफ मुंबई बोरीवली ईस्ट यांच्या सहकार्यातून प्रशस्त भव्य दिव्य शालेय इमारत उद्घाटन कार्यक्रम सुनिलजी भुसारा आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ मुंबई बोरीवली ईस्ट यांनी एक वर्षांपूर्वी शाळेत भेट देऊन शालेय परिस्थिती जाणून घेतली मुख्याध्यापक, एस. एम. सि अध्यक्ष केंद्रप्रमुख यांच्या विनंती मागणीनुसार नवीन वर्ग खोल्या बांधण्याचे ठरविले यामध्ये वर्गखोल्या कम्प्युटर लॅब प्रयोगशाळा, लायब्ररी इत्यादीसाठीही हॉल बांधण्याची ठरवले त्यानुसार सद्यस्थिती चार वर्ग खोल्याचे काम पूर्ण झाले असून सदर खोल्यांचे उद्घाटन आमदार सुनीलजी भुसारा, सुरेखा थेतले विद्यमान जि.प सदस्या तथा माजी अध्यक्षा जिल्हा परिषद पालघर, सरपंच काकडीताई जंगली, मोमेंटिव परफॉर्मन्स मटेरियल इंडिया प्रा.लिमिटेडचे विनोद शर्मा, शुभम त्रिवेदी, रोटरी क्लब ऑफ मुंबई बोरीवली ईस्ट चे अध्यक्ष पंकज करडे व कार्यकारणी सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या क्षणी इमारतीच्या पुढच्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले.
सदर इमारत बांधकामामुळे शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण होऊन गुणवत्ता विकास व शाळा विकासासाठी याचा भरपूर फायदा होणार आहे व तालुक्यात एक आदर्श शाळा निर्माण होण्यासाठी शाळेची वाटचाल होणार आहे
आजूबाजूच्या आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी एक दर्जेदार शाळा तयार होईल सदर कार्यामुळे ग्रामस्थ, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सदर शाळा आदर्श शाळा करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न राहतील असे आश्वासित केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, यशवंत बुधर साहेब, भोये साहेब,सहाय्यक गटविकास अधिकारी येंदे साहेब, चौधरी साहेब विस्तार अधिकारी शिक्षण, गोरे साहेब विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख घेगड, जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे महाजन, गिरीश मित्तल, प्रकाश निर्मल, उपसरपंच सोनू डंबाळी, ग्रामसेवक माळी, केंद्रप्रमुख पवार, एस. एम. सि अध्यक्ष जयराम कव्हा सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन सदस्य व ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ मुंबई बोरवली ईस्टने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्याध्यापक रामचंद्र भरसट यांनी शाळेच्या वतीने आभार पत्र देण्यात आले, तसेच पंचायत समिती जव्हार व शाळेतर्फे गौरव चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
0 Comments