औरंगाबाद - शिक्षक-विद्यार्थी-समाज व शिक्षण व्यवस्थेतील उपयोगिता वाढवून सकारात्मकता वृद्धिंगत करणे हेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय असल्याचे अधिष्ठाता प्रा डाॅ. चेतना सोनकांबळे यांनी स्पष्ट केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या ' नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: स्वरूप व अंमलबजावणी ' या विषयावर मार्गदर्शन करतांना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विविधता , गुणात्मकता , तंत्रज्ञानाचा वापर व कालसापेक्षता डाॅ. चेतना सोनकांबळे यांनी स्पष्ट केली .
यावेळी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डाॅ. दिलीप बिरूटे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वरूप , व्याप्ती व सामाजिक, राजकीय व शैक्षणिक परिणामांची दखल घेत शिक्षक विद्यार्थी यांच्या परस्पर संबंधाचा अनुबंध स्पष्ट केला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आजीवन शिक्षण विस्तार विभागाच्या कार्याबाबत माहिती प्रा.नवनाथ गोरे यांनी करून दिली. यावेळी सोनाली तायडे , अर्पित भवरे व भाग्यश्री निंबाळकर यांनी संपादित केलेल्या भिंत्तीपत्रकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप आयक्यूएसीचे समन्वयक डाॅ. बी.एन.शिंदे यांनी नवराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू सांगत केला.
यावेळी प्रा एस.पी.खिल्लारे, डाॅ. जी.डी.आढे, डाॅ. एस पी.बुधवंत, डाॅ. व्ही. जी.पिंगळे, डाॅ.प्रज्ञा रुईकर साळवे यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. आरती पांडे यांनी तर आभार डाॅ. आर.व्ही. मस्के यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. किरण कांबळे, डाॅ.गणेश खिल्लारे , डाॅ.राजू वानखडे, डाॅ.प्रेमराज वाघमारे, डाॅ.मिलिंदराज बुक्तरे, डाॅ. सतीश वाघमारे, डाॅ. संघरत्न गवई, डाॅ. समाधान वाघमारे, डाॅ. साहेबराव वाठोरे, डाॅ. विजय आडे, डाॅ. संजय खरात, डाॅ.वनमाला लोखंडे मॅडम, डाॅ. वडमारे मॅडम, डाॅ.खरात मॅडम, डाॅ. वैशाली लहाने , डाॅ. ज्योती केदारे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी - विशाल पठारे
0 Comments