खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनृस्मृती का जाळली - डॉ यशवंत मनोहर

मनूने स्त्रीचे स्वातंत्र्य जाळले
मनुस्मृतीने स्त्रियांनाही असेच अपमानित करून ठेवलेले आहे. मनुस्मृतीने स्त्रियांना स्वातंत्र्यापासून पूर्णतः वंचित ठेवले आहे. नववा अध्याय स्त्रिच्या निंदेनेच सुरू होतो. नवव्या अध्यायाचे हे प्रारंभीचेच श्लोक असे
"अस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः पुरुषः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे " (९:२)
"पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंन्त्रमर्हति" (१३)
या श्लोकाचा अर्थ असा जवळच्या आप्त पुरुषाने स्त्रियांना आपल्या ताब्यातच ठेवावे. त्यांना इंतर विषयांची चटक लागू देऊ नये. त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी आणि स्त्रीच्या लहानपणी तिला तिच्या वडिलाने सांभाळावे तिला तिच्या पतीने संरक्षण द्यावे तर तिच्या म्हातारपणी तिला तिच्या मुलांनी सांभाळावे. स्त्री अशी सतत पराधीन आहे. ती स्वातंत्र्यास पात्र नाही. हाच आशय पाचव्या अध्यायातही मनुस्मृतीने सांगितला आहे. लहान मुलीने, तरुण स्त्रीने वा म्हाताऱ्या बाईनेही घरातले काम स्वतःच्या अधिकारात कधी करू नये हे सांगणारा श्लोक असा
-
"बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता
न स्वातंत्र्येण कर्तव्यं किंचित्कार्य गृहेष्वपि " (५ : १४७)
स्त्रीने लहानपणी पित्याच्या छत्राखाली राहावे. तरुणपणी पतीच्या खाली राहावे आणि म्हातारपणात तिने मुलाच्या छत्राखाली राहावे. स्वतंत्रपणे वा स्वतंत्रवृत्तीने कधीही राहु नये हे सांगणारा श्लोक असा-
"बाल्ये पितृर्वशे निष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने
पुत्राणां भर्तरि प्रेते व भजेस्त्री स्वतन्त्रताम्" (५१४८)
पुढल्या श्लोकातच मनुस्मृती हे सांगते की पिता, पती आणि पुत्र यांच्यापासून दूर राहणारी स्त्री दुष्कृती झाली तर ती दोन्ही कुळास कलंक लावते.
आसूर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच या विवाहांचे वेगवेगळेपण 'मनुस्मृती' सांगते.वधू-वरांना सजवून, पूजा करून जो विद्वान आहे व कन्येची याचना न करणारा आहे अशा वराला कन्यादान करणे म्हणजे ब्राह्मविवाह होय. (३ २७) ज्योतिष्ठोम यज्ञाच्या आरंभी ऋत्विजांना कन्या अर्पण करणे म्हणजे दैव विवाह होय. (३ : २८) यज्ञासाठी वा मुलीसाठी वराकडून गाय-बैल यांची एक जोडी वा दोन जोड्या घेतल्यानंतर करण्यात येणाऱ्या कन्यादानाला आर्षविवाह म्हणतात. (३ : २९) दोघांनी धर्माचरण करावे अशी प्रार्थना करून वर पूजा केल्यावर करण्यात येणाऱ्या ३०) मुलीच्या पालकास आणि कन्यादानाला प्राजापत्य विवाह म्हणतात (३ मुलीला द्रव्य देऊन होणारा विवाह आसूर विवाह होय (३ : ३१) परस्परावरील प्रेमातून घडणारा विवाह हा गांधर्व विवाह होय (३ : ३२) तर मुलीच्या पालकास मारून वा धाक दाखवून तिला पळवून आणून केला जाणारा विवाह हा राक्षस- विवाह होय (३ : ३३) मदविव्हळ आणि झोपलेल्या कन्येशी गुप्तपणे मैथुन करणे हा अधार्मिक असा पैशाच विवाह होय (३ : ३४) हे सांगून मनुस्मृती सांगते. 
" चतुरो ब्राह्मणस्याद्यान्प्रशस्तान्कवयो विदुः ।
राक्षसं क्षत्रियस्यैकमासुरं वैश्यशूद्रयोः " (३ : २४)
म्हणजे ब्राह्म, दैव, आर्ष आणि प्राजापत्य हे चार विवाह ब्राह्मणांसाठी श्रेयस्कर आहेत. क्षत्रियाला राक्षसविवाह श्रेयस्कर आहे तर वैश्य आणि शूद्र यांना आसूर विवाह योग्य होय. आतिथ्यासंबंधी आणि भोजन यासंबंधीही मनुस्मृतीने काही दंडक सांगितले आहेत. वैश्य किंवा शूद्र ब्राह्मणाच्या घरी अतिथी म्हणून आले तर त्यांना घरच्या नोकरांसोबत जेवू घालावे. हे पुढील श्लोक सांगतो.
'वैश्यशूद्रावपि प्राप्तो कुटुम्बेऽतिथिधर्मणौ ।
भोजयेत्सह भृत्यैस्तावानृशंस्यं प्रयोजयन् " (३ : ११२)
आणि ब्राह्मणाच्या घरी क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मित्र आप्त किंवा गुरु हे
अतिथिसमानं मानले जाऊ नयेत. हे पुढील श्लोक सांगतो.
न ब्राह्मणस्य त्वतिथिगृहे राजन्य उच्यते
वैश्यशूद्रो सखा चैव ज्ञातयो गुरुरेव च " (३ : ११०)
ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर वर्णांच्या लोकांबद्दल कडवा दुजाभाव इथे प्रकट झालेला आहे. ब्राह्मण वजा जाता मनुस्मृतीत इतर सर्वांनाच अत्यंत नीच, नगण्य आणि तुच्छ म्हणून गणले गेले आहे. इतर सर्वांनीच ब्राह्मणाचा सर्व संदर्भात सन्मान केला पाहिजे. त्याचे श्रेष्ठत्व जपले पाहिजे असे सांगणारी मनुस्मृती इतर वर्णाबद्दल मात्र अवमानाच्याच भाषेत बोलते. सामाजिकदृष्ट्या या सर्वांनाच ती अप्रतिष्ठित करते.
मनूने स्त्रीचे स्वातंत्र्य जाळले
मनुस्मृतीने स्त्रियांनाही असेच अपमानित करून ठेवलेले आहे. मनुस्मृतीने स्त्रियांना स्वातंत्र्यापासून पूर्णतः वंचित ठेवले आहे. नववा अध्याय स्त्रिच्या निंदेनेच सुरू होतो. नवव्या अध्यायाचे हे प्रारंभीचेच श्लोक असे -
"अस्वतन्त्राः स्त्रियः कार्याः पुरुषैः स्वैर्दिवानिशम् ।
विषयेषु च सज्जन्त्यः संस्थाप्या आत्मनो वशे " (९:२)
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंन्त्रमर्हति " (९ : ३)
या श्लोकाचा अर्थ असा ,जवळच्या आप्त पुरुषाने स्त्रियांना आपल्या ताब्यातच ठेवावे. त्यांना इंतर विषयांची चटक लागू देऊ नये. त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी आणि स्त्रीच्या लहानपणी तिला तिच्या वडिलाने सांभाळावे. तरुणपणी तिला तिच्या पतीने संरक्षण द्यावे तर तिच्या म्हातारपणी तिला तिच्या मुलांनी सांभाळावे. स्त्री अशी सतत पराधीन आहे. ती स्वातंत्र्यास पात्र नाही. हाच आशय पाचव्या अध्यायातही मनुस्मृतीने सांगितला आहे. लहान मुलौने, तरुण स्त्रीने वा म्हाताच्या बाईनेही घरातले काम स्वतःच्या अधिकारात कधी करू नये हे सांगणारा
श्लोक असा -
"बालया वा युवत्या वा वृद्धया वापि योषिता।
न स्वातंत्र्येण कर्तव्यं किंचित्कार्य गृहेष्वपि " (५ : १४७)
स्त्रीने लहानपणी पित्याच्या छत्राखाली राहावे. तरुणपणी पतीच्या छत्राखाली राहावे आणि म्हातारपणात तिने मुलाच्या छत्राखाली राहावे. स्वतंत्रपणे वा स्वतंत्रवृत्तीने कधीही राहू नये हे सांगणारा श्लोक असा -
" बाल्ये पितृर्वशे निष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने ।
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्स्त्री स्वतन्त्रताम् " (५ १४८)
पुढल्या श्लोकातच मनुस्मृती हे सांगते की पिता, पती आणि पुत्र यांच्यापासून दूर राहणारी स्त्री दुष्कृती झाली तर ती दोन्ही कुळास कलंक लावते.
स्वभाव एव नारीणां नराणामिह दूषणम्।'
अतोऽर्थान्त्र प्रमाद्यन्ति प्रमदासु विपश्चितः " (२ : २१३)
अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः ।
प्रमदा ह्युत्पथं नेतुं कामक्रोधवशानुगम् " (२ : २१४)
या श्लोकाचा अर्थ असा की नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडविणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे म्हणून ज्ञानी माणसे त्या वाटेला जात नाहीत. शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध, काम अशा विकारांमुळे ज्ञानी-अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावू शकतात.
पश्चिल्याश्च लचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः ।
रक्षिता यत्नतोऽपीहि भर्तृष्वेता विकुर्वते " (९ : १५)
म्हणजे पुरुषांना पाहताच स्त्रियांच्या मनात संभोगाची इच्छा उत्पन्न होते. त्या चंचल असतात. अप्रेमी असतात. म्हणून कितीही रक्षण केले तरी त्या व्यभिचारी वागण्याचा संभव असतो. खालच्या श्लोकातही स्त्रीची अशीच निर्भत्सना मनुस्मृतीने केलेली आहे.
" शय्यासनमलंकारं कामं कोथमनार्जवं ।
द्रोहभावं कुचर्या च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् " (९ : १७)
म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच झोपा काढणे, दागिन्यांचा मोह, बसून राहणे, क्रोध, कामभावना, द्वेष, निंदा आणि हिंसा या गोष्टी मनूने स्त्रियांना दिलेल्या आहेत. कोणाही संवेदनशील आणि समताशील स्त्रीच्या तळपायाची आग मस्तकात जावी आणि कोणाही सुसंस्कृत आणि सुसभ्य पुरुषाचे माथे भडकावे अशीच ही स्त्रीनिंदा आहे यात शंका नाही. अनेक लोक कुटुंबात असताना स्त्रीने पतीच्या आज्ञेशिवाय वेगळा धनसंचय करू नये हे नवव्या अध्यायातील १९९ व्या श्लोकात मनुस्मृती सांगते. स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाही हे पाचव्या अध्यायातील १६२ व्या श्लोकात मनुस्मृती सांगते. एवढेच नाही तर नवऱ्याने आपली बायको विकली वा टाकली तरी नवऱ्याचा तिच्यावरील अधिकार नष्ट होत नाही; ती नवऱ्याचीच पत्नी राहते हे मनुस्मृती पुढील श्लोकात सांगते -
न निष्क्रयविसर्गाभ्यां भतृभार्या विमुच्यते ।
एवं धर्म विजानीमः प्राक्प्रजापतिनिर्मितम् " (९ : ४६)
इथेही स्त्रीच्या पुनर्विवाहाला मनुस्मृती नकार देते ही बाब आपल्या लक्षात येते. शिवाय नवरा मेल्यावर जी स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करते तिला स्वर्गप्राप्ती होते असे मनू सांगतो. पती कसाही असला तरी स्त्रीने पतीला परमेश्वरच मानावे. नवरा दुराचारी असो, स्वैराचारी असो किंवा कोणताही गुण त्याच्यात नसो स्त्रीने त्याला परमेश्वर मानावे आणि त्याची सेवा करावी. पती जुगारी, मद्यपी, रोगपीडित वा षंढ असला तरी स्त्रीने त्याची सेवाच करावी हे मनू पुढील श्लोकात सांगतो.
"विशील: कामवृत्तो वा गुणैर्वापरिवर्जितः ।
उपचर्य: स्त्रिया साध्व्या सततं देववत्पत्तिः " (५ : १५४)
आणि स्त्रियांना इतर यज्ञ व पतीच्या आज्ञेशिवाय इतर उपवास व व्रते नाहीत. पण तिने केलेली पतीसेवा हीच तिला स्वर्गप्राप्ती करून देते. हे सांगणारा श्लोक असा -
नास्ति स्त्रीणां पृथग्यज्ञो न व्रतं नाप्युपोषितम्
पतिं शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते " (५ : १५५)
आणि मृत्यूनंतर पती ज्या लोकाला गेला असेल त्याच लोकात जाण्याचीइच्छा पत्नीने बाळगावी. पती जिवंत असो वा मृत असो त्याला रुचणार नाही असे कोणतेही वर्तन पत्नीने चुकूनही करू नये हे -
"पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा ।
पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत्किंचिदप्रियम् " (५ : १५६)
या श्लोकात मनुस्मृती सांगते आणि -
नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रेरिति धर्मे व्यवस्थितीः ।
निरीन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रियोऽनृतमिती स्थिती: " (९ : १८)
या श्लोकात मनूने स्त्रियांवरील संस्कारांना वैदिक मंत्र नाकारले. वैदिक मंत्रांचे संस्कार न झालेल्या या स्त्रिया म्हणजे केवळ असत्य होत असे सांगणारा मनू स्त्रियांचा विचार जनावरांसोबत करतो. (५ : १३०) शिवाय तीस वर्षांच्या तरुणाने बारा वर्षाच्या मुलीशी किंवा चोवीस वर्षांच्या तरुणाने आठ वर्षांच्या मुलीशी लग्न करावे. (९ : ९४) असे मनू सांगतो. मनू स्त्रियांना रत्न म्हणतो व या रत्नांचा संग्रह कुठूनही करावा (२ : २४०) असे सांगतो. पुरुषांच्या अनिर्बंध भोगेच्छेला मोकळिक देतो. स्त्री मनूने दुर्गुणसंपन्न म्हणूनच चितारली. मग

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः(३ : ५६)
जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवता प्रसन्न होतात असे इथे मनू का म्हणतो? स्त्रियांच्या गुलामगिरीचे टोकाचे समर्थन करणारा मनू असे का म्हणतो ? प्रा. नरहर कुरुंदकरांच्या भाषेत या श्लोकातील मनूची मखलाशी पुढीलप्रमाणे सांगता येईल. पण नारी पूजनीय केव्हा होते ? सर्वस्वाने व स्वेच्छेने जर ती गुलामगिरीत धन्यता मानू लागली तरच ती पूजनीय होते. स्त्री ही दुष्कुलातले असले तरी रत्नच मानावे असेही मनूचे मत आहे. पण या मताचा अर्थ इतकाच आहे की देखणी स्त्री उपभोगासाठी स्वीकारताना भोगसुख पहावे, तिच्या कुलाचा विचार करू नये. अन्नवस्त्राच्या मोबदल्यात प्रजोत्पादन व सेवा यांचे एक साधन म्हणून स्त्री आहे यामुळे स्त्रीप्रशंसापर सारी वचने निरर्थक ठरतात.' (मनुस्मृती काही विचार : १९८३, पृ. ६८) स्त्रीने मनूच्या कायद्यानुसार गुलाम राहून दाखविले तरच ती आदर्श आणि पूजनीय मानली जाईल हा मनुस्मृतीचा प्रस्ताव गुलामगिरीच्या सत्काराचा प्रस्ताव आहे आणि समता या मूल्याला महामूल्य मानणाऱ्या कोणाही सभ्य माणसाला हा दुष्ट प्रस्ताव मान्य होणेच शक्य नाही. या देशात जन्म झालेल्या ब्राह्मणापासून सर्व जगातील लोकांनी सदाचार शिकावा (२ : २०) असे मनू म्हणतो. "मनुस्मृती फक्त जन्माने ब्राह्मण असणाऱ्या व्यक्तींच्या इहलोकातील हितसंबंधांचा विचार करते व ते हितसंबंध सांभाळण्यासाठी इतरांना गुलाम करणाऱ्या विषम समाजरचनेला पूज्य ठरविण्याचा प्रयत्न करते.' (मनुस्मृती : काही विचार: नरहर कुरुंदकर, पृ. १६०) ही अशी मनुस्मृती जाळणे मानवी प्रतिष्ठेच्यासाठी अपरिहार्यच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २८.१०.१९५१ रोजी लुधियाना येथील भाषणात म्हटले आहे की "जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा वर्णव्यवस्था कार्यरत झाली. लोकांना त्यांच्या जन्मावरून‌ सामाजिक दर्जा देण्यात आला. काहींना ब्राह्मण म्हणण्यात आले. काहींना क्षत्रिय, काहींना वैश्य आणि इतरांना अस्पृश्य" (रायटिंग्ज अँड स्पीचेस, खंड १८, भाग ३, पृ. २५७) म्हणूनच आता हे सांगितले पाहिजे की मनुस्मृती हा या बाहेरून‌आलेल्या ब्राह्मणांची सर्व प्रकारची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करणारा, वंशश्रेष्ठत्व साबीत करणारा आणि त्यासाठी इतरांना हजारो वर्षे न विझणारी गुलामीची भीषण आग लावणारा ग्रंथ आहे. त्याला तेवढ्याच भीषण आगीत जाळणे हाच उपाय होता. डॉ. आंबेडकरांनी त्यासाठीच मनुस्मृती जाळली.

डॉ आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?
डॉ यशवंत मनोहर
मनुस्मृती दहन दिनाच्या सर्व लाभार्थ्यांना मंगलमय सदिच्छा

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools