कोल्हापूर सारख्या लहानशा संस्थानामध्ये सर्व जाती धर्मासाठी काम करीत असताना, आपल्या संस्थानामध्ये शाहू राजांनी घेतलेले मागासवर्गीयांना आरक्षण प्राथमिक शिक्षणाचा कायदा, रस्ते, जलसंवर्धन, कलानगरी म्हणून ओळख, उद्योग, नर्सरी निर्माण करीत असताना माणगावच्या ऐतिहासिक परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मागासवर्गीयांचे नेते जाहीर करून भविष्यात (पुढील काळात) अखंड हिंदुस्तानचे पुढारी होतील ही घोषणा करून देशाला संविधान निर्माता दिला असे उदगार राष्ट्रपुरुष शाहू या विषयावर बोलताना कोगनोळी तालुका निपाणी मराठा मंडळ येथे दिनांक 26 जून 2024 रोजी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या 150 व्या शतकोतर सुवर्ण जयंतीनिमित्त व्याख्याते उमेश सूर्यवंशी कोल्हापूर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, शाहू राजाने वर्तमान काळ जगताना भूतकाळातील महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ जोपासताना भविष्यकाळ म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे पाहिले. त्यामुळे संविधानाच्या कलमांची बीजे आपल्या संस्थानात 1910 ते 1920 सालीच पेरून संविधानाचा पाया भरला होता. त्यामुळेच लोकराजा शाहू महाराज हे राष्ट्रपुरुष होते असे ते म्हणाले. त्याकाळी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन मागासवर्गीय यांना उद्योजक बनवायचे कार्य प्रथम शाहू राजांनी केले असेही ते म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती लोकराजा शाहू महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर श्री उमेश पाटील (मराठामंडळ उपाध्यक्ष) तसेच बाबासो पाटील (नृसिंह पाटील) व सामाजिक कार्यकर्ते मनसुर शेंडुरे यांच्या शुभ हस्ते झाले. छत्रपती शाहू जयंती निमित्त आयोजित केलेल्या शाळेतील मुलांच्या शाहू राजा या विषयावरील भाषण स्पर्धेचे बक्षीस वितरण माननीय श्री. बी.बी. पाटील यांचे शुभ असते करण्यात आले. व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजीराजे कोण होते या 500 प्रतींचे वितरण करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. संजय डुम दत्तवाडी, मावळाचे अध्यक्ष मा. उमेश पवार कोल्हापूर, सामाजिक कार्यकर्ते मा.के डी सर, संविधान अभ्यासक एडवोकेट मा.सूर्याजी पोटले , शिवराज मंचचे अध्यक्ष मा. इंद्रजीत घाडगे , निपाणीचे मा. सतीश कराळे, मा. सचिन घोरपडे करनूर मा.नितीन कानडे (युवा बौद्ध धम्म परिषद जिल्हा संघटक व रयत संघटना निपाणी तालुका युवा अध्यक्ष), सौ मनीषा परीट ग्रामपंचायत सदस्य, अशोक हेंगाडे, सचिन पाटील हंबरवाडी,अनिस मुल्ला सर, प्रजावाणी फाउंडेशनचे कृष्णात पसारे (popat) सचिन परीट, तात्यासो खोत, अमोल नवाळे, तोशिप मुल्ला,नरजीत विटे, युवराज परीट, गंगाराम चकाटे, तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी तसेच बहुजन समाजातील असंख्य कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. अरुण पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण जगताप सर यांनी केले. सर्वांचे आभार प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी केले.
0 Comments