यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना डाॅ. वाल्मीक सरवदे प्र कुलगुरु डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक धोरण तसेच त्यांनी भारताच्या भावी जडणघडणीत ऊर्जा धोरण, जलधोरण, कृषीधोरण उद्योग, कारखाने अशा भौतिक विकासाच्या बाबीसह सामाजिक एकात्मता, विषमता मुक्त समाज, वंचित, उपेक्षितांच्या न्याय्य व समताधिष्ठीत समाजाचे पाहिलेले स्वप्न आजच्या बदलत्या शैक्षणिक क्रांतितून साकार होईल.
ते सत्यात उतरवण्यासाठी स्कीलबेस शिक्षण, उद्योग, व्यवसायाभिमुख रोगगार प्रेरित करणारे, आव्हानांना सामोरे जाणारे शिक्षण घेऊन समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याचे आवाहन केले.
प्रारंभी नागसेनवनातील सर्वच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विचारमंचावर मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. वैशाली प्रधान, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस.डी.राठोड, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अभिजित वाडेकर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. के. खिल्लारे, पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवाजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.नवनाथ गोरे यांनी तर आभार डाॅ. आर.व्ही. मस्के यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास नागसेनवनातील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments