अमरावती - डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे गरीब, गरजू, अनाथ सिकल सेल रुग्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सिकल सेल संघ, अमरावती तर्फे करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाचा उद्देश अनाथ, गरजू व ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची आहे अशा सिकल सेल रुग्ण विद्यार्थ्यांना मदत करणे त्यांच्यात शिकण्याची जिद्द निर्माण करणे व समाजातील लोकांना सिकल सेल रुग्ण विद्यार्थ्याकडे मदतीच्या दृष्टिकोनातून पाहणे हा होता.
आजारामुळे व अनेक शारीरिक वेदनेमुळे मानसिक दृष्टया खचून न जाता शिक्षण घेऊन सिकल सेल रुग्ण डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नर्स, क्लार्क होत आहेत.
त्यासाठी त्यांना समाजातील समाजसेवी लोकांच्या मदतीची गरज आहे.
श्री. गोवर्धन भगत, अशोक भोरे, मनोज पाटील, दिवाकर मेश्राम , डॉ. कमलाकर गोवर्धन, विनीत मेश्राम प्रिया मॅडम, मिलिंद इंगळे, विपीन सवई, श्रीकृष्ण पुरी, राहुल वानखडे, विशाल बागडे, राहुल मुंद्रे, मधुर वर्मा यांनी शालेय साहित्य घेण्यासाठी मदत केली.
ह्या कार्यक्रमामध्ये सिकलसेल संघाचे श्री. गोवर्धन भगत, श्री. अशोक भोरे, डॉ. कमलाकर गोवर्धन, श्री. दिवाकर मेश्राम, श्री. रोहीत दुफारे, श्री. विनोद रंगारी, श्री. मिलिंद इंगळे, श्री. विपीन सवाई तसेच सिकलसेल समुपदेशक श्री. मनोज पाटील, भारतीय दलीत पँथरचे श्री . मनोज धुळेकर, श्री. प्रशिक पाटील, श्री. अंकीश मेश्राम, उपस्थित होते .
यावेळी श्री. मनोज पाटील यांनी संचालन, डॉ. कमलाकर गोवर्धन यांनी प्रस्तावना व श्री. अशोक भोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवेस खान, भुमी मेश्राम, चेतन डोंगरे, वैशाली गजबे, सुलोचना सोनटक्के, लक्ष्मी गवई, नेहा मेश्राम, भुमी खंडारे व सिकल सेल संघ अमरावती व भारतीय दलित पँथरचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
0 Comments