छ.संभाजी नगर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) छ.संभाजीनगर शहर जिल्हा सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे यांची निवड करण्यात आले.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
यावेळी शहरजिल्हा सरचिटणीस निवडीचे नियुक्तपत्र अभिजीत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळात पोहोचविण्यासाठी तसेच पक्ष संघटना वाढविण्यास कार्य करण्याचा मानस यावेळी गणेश काळे यांनी व्यक्त केला.गणेश काळे हे विद्युत कंत्राटदार असुन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंत्राटदार संघटनेमध्ये कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँगेस (अजित पवार गट) व मित्र परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments