छत्रपती संभाजीनगर-शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानचे सचिव तथा माजी मनपा सभापती मिलिंद दाभाडे याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. वाल्मीक सरवदे सर यांचा अशोक स्तंभाची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला..
यावेळी प्रतिष्ठाण चे कार्याध्यक्ष धनंजय बोरडे यांच्यासह प्रतिष्ठानच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा' मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा' या उपक्रमांतर्गत सत्कार करण्यात आला.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या निवडक आदेशाचे शासनाचे पुस्तकही भेट देण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे याबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात येत आहे .
त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र कुलगुरू पदी विराजमान असलेले डॉक्टर वाल्मीक सर्वदे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला आहे
याबरोबरच विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या साठी देखील भरीव कामगिरी केली आहे एकूणच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या साठी केलेल्या उल्लेखनीय आणि भरीव कामगिरीबद्दल त्यांचा शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला .
या सत्काराप्रसंगी धनंजय बोरडे, प्रवीण इंगळे, डॉ. गौतम गायकवाड , अमोल घोबले यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments