खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

लाडकी बहीण योजनेतील माता भगिनीतील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार - आनंद परांजपे

लोकसभेप्रमाणेच कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनाही निवडून आणायचे आहे - डाॅ श्रीकांत शिंदे
कळवा मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे - नजीब मुल्ला

लाडकी बहीण योजनेतील माता भगिनीतील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार - आनंद परांजपे

कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा - संजय वाघुले

प्रतिनिधी ठाणे- लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयाप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे जाहीर उद्गार कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांनी काढले. तर कळवा मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे असे मत कळवा मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीव मुल्ला यांनी व्यक्त केले. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींमधील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. तर कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा. असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ कळवा विभागाच्या वतीने शनिवारी सायबा हॉल, मनिषा नगर, कळवा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी वरील मान्यवर मार्गदर्शन करताना बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने माझा विजय झाला. पण कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आपला माणूस नसल्याने माझ्यामार्फत कामे होताना त्रासही होत आहे. 

यासाठी पक्ष न पाहता महायुतीचा उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणायचे आहे. 
आपल्या मतदारसंघातील आपला हक्काचा माणूस म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचे नियोजन करा, असे आदेशच कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय सहकार्याने व कल्याण लोकसभेतील खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीमुळ माझ्यामार्फत खासदार निधी व ठाणे महापालिकेचा निधी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात खर्च झाला. 

यामुळेच कळवा मुंब्र्यात विकासकामे होऊ शकली. असे असताना स्थानिक आमदार या विकास कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

अजितदादांनी माझ्यामार्फत १५० कोटी रुपये कळवा मुंब्र्यातील विकासकामांसाठी दिले. कळवा मुंब्र्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेतील महापालिका शाळा सुरु करणे इतर नागरी प्रश्न मार्गी लावणे या सेवाभावनेतुन कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी लढवित आहे. 

कळवा मुंब्रा विधानसभेतील ४५ डजार लाडक्या बहीणींच्या आशिर्वादाने या मतदारसंघातील दादागिरी संपविणे आणि अहंकार विरुद्ध विकास यासाठी ही लढाई सुरु असल्याचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. 
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे महाराष्ट्राचे शीर्ष नेतृत्व व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही मातृशक्ती कळवा मुंब्र्यातील विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना भरभरून मतदानरुपी आशिर्वाद देईल अशी आशा आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. 

कळवा मुंब्र्यातील विकासासाठी शिवसेना भाजप व नजीब मुल्ला यांच्यामुळे ठाणे महापालिकेचा निधी आला आहे. पण स्थानिक आमदार याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व येथे निर्माण करावे, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. 
यावेळी शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कवाडे गट आदी महायुतीतील पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.



Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools