खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद मध्ये १५०९ पदांची मेगा भरती, पगार १३००० – ७५००० रुपये


प्री प्रायमरी स्कूल अॅक्रेडिटीएशन कॉन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्वावर खालील एकूण १५०९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
१) प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या वरील पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट “१” संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) परीक्षा दिनांक याबातची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
३) पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती :- १) वरील पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा भारतीय नागरीक असावा.
२) वरील पदांसाठी अर्ज केलेला उमेदवाराचे वयोमर्यादा १८ ते ३८ पर्यंत असेल.
३) उमेदवारांना परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहावे.
४) सदरील लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास मुलाखत देणे अनिवार्य असेल. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास वरील वेतनश्रेणीनुसार पदभार देण्यात येईल. ५) सदर भरती प्रक्रीया राज्यस्तरावरून एकत्रितरित्या राबविली जात असली तरी, पदांची भरती यादी तयार करतांना प्रत्येक जिल्हा व तालुक्याचे स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण व त्याने अर्ज केलेल्या जिल्हा व तालुका करताच विचारार्थ घेतले जाईल. त्याचा अन्य जिल्हा निवड यादीशी कोणताही संबंध राहणार नाही..




Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools