खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

50 मतदारसंघापैकी 25 मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना मोठी लढत, कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

ठाणे/दै.मू.वृत्तसेवा
सोमवारी संध्याकाळनंतर प्रचार बंद होणार असून मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तशी प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. दरम्यान राज्यातील 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मोठी लढत होणार आहे. या 50 मध्ये जवळपास 25 ठिकाणी बिग फाईट लढती पाहायला मिळत आहेत. यामध्ये मतदार कोणाला कौल देतात हे निवडणूक निकालानंतरच पाहायला मिळणार आहे.
50 पैकी बिग फाईट लढतीमध्ये कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध नीलेश राणे, मुंबई मागाठाणेमध्ये प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर, भांडुप पश्चिममध्ये रमेश कोरगावकर विरुद्ध अशोक पाटील, जोगेश्वरी पूर्वमध्ये मनीषा वायकर विरुद्ध अनंत नर, दिंडोशीमध्ये सुनील प्रभू विरुद्ध संजय निरूपम, चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर विरुद्ध तुकाराम काते, माहीममध्ये सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, भायखळात यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसूतकर, बुलडाण्यात संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळके, मेहकरात संजय रायमूलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात, बाळापूरमध्ये बळीराम शिरसकर विरुद्ध नितीन देशमुख, कळमनुरीत संतोष बांगर बिरुद्ध संतोष तारफे, परभणीत राहुल पाटील विरुद्ध आनंद भरोसे, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर, छ. संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे, नांदगावमध्ये सुरेश कांदे विरुद्ध गणेश धात्रक, पालघरमध्ये राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळा, रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने, राजापुरात राजन साळवी विरुद्ध किरण सामंत, सावंतवाडीत दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली, राधानगरीत प्रकाश आबिटकर विरुद्ध केपी पाटील, सांगोल्यात शहाजी बापू पाटील विरुद्ध दीपक आबा पाटील, अंबरनाथमध्ये बालाजी किनौकरविरुद्ध राजेश वानखेडे, महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप, पैठणमध्ये विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे या 25 लढती बिग फाईट लढती म्हणून पाहिल्या जात आहेत.

मुंबईत ज्या 11 लढती शिवसेना विरुद्ध शिवसेना होत आहेत, यामध्ये सगळ्याच मतदारसंघात चुरस पाहायला मिळत आहे. ठाकरेंचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, ऋतुजा लटके, प्रकाश फातर्पेकर, सुनील प्रभू, संजय पोतनीस हे निवडणूक रिंगणात आहेत, तर शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा, अशोक पाटील, मनीषा वायकर, संजय निरूपम, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे रिंगणात आहेत.

कोकणात ठाकरे गटाकडून वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, बाळ माने, राजन तेली, स्नेहल जगताप, सुभाष भोईर असे उमेदवार रिंगणात आहेत तर शिंदे सेनेकडून एकनाथ शिंदेंबरोबरच नीलेश राणे, उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, राजेंद्र गावित असे उमेदवार रिंगणात असून दोन्ही बाजूकडून प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

एकूण 50 पैकी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा कोकणात एकूण 14 लढती होत आहेत, तर मुंबईत 11 लढती होत आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात 13 तर पश्चिम महाराष्ट्रात 4 ठिकाणी या लढती होत आहेत. एकूण 50 मतदारसंघांमध्ये शिंदे आणि ठाकरे यांच्या प्रचारसभांनी या निवडणुकीत रंग भरला आहे.

सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांना दीपक आबा साळुंखे या ठाकरे गटाच्या उमेदवाराने मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट यांना ठाकरे गटातील राजू शिदे यांनी मोठे आव्हान दिले आहे. रत्नागिरीत उदय सामंतांसमोर रवींद्र ऊर्फ बाळ माने यांनी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांना ठाकरे गटातील राजन तेली यांनी आव्हान दिले आहे.

- किरण आरके ( मुख्य संपादक न्यूज 24 खबर ) 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools