प्रतिनिधी ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ महायुती आणि घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक ९ येथून एकत्रित निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपनेते दशरथ पाटील, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे उपशहरप्रमुख मनोज ल्हासे, स्थानिक नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, गणेश साळवी, विजया ल्हासे, अनिता गौरी, गणेश कांबळे यांच्यासह मोठ्यासंख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोशपूर्ण वातावरणात उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचाराची रॅलीची सुरुवात खारीगाव नाका येथून शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आली.
यावेळी फटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नजीब मुल्ला यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाही दिल्या. खारीगाव नाका, पाखाडी नाका, हिरादेवी मंदिर, आझाद चौक, होळीमाता चौक, मनोज ल्हासे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिर, केशव हाईटस, आदर्श पारसिक मित्र मंडळ, नंदनवन होम्स, नेचर ग्लोरी, रिलायन्स मार्केट, वास्तुआनंद सोसायटी, राजपार्क सोसायटी या मार्गावरून रॅली जाऊन चाव॔डाई मंदिर येथे नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचार रॅलीचा समारोप करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
१४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातुन नजीब मुल्ला यांना विजयी करुन, नजीब मुल्ला यांच्या विजयाची भेट शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, महायुतीचे कार्यकर्ते देणार आहेत, असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी निवडणुक प्रचार रॅलीत बोलताना काढले.
ज्या गावात लहानपणापासून माझे नाते होते त्या खारीगावातुन निवडणुक प्रचार सुरु करण्यात आला. ज्या मतदारसंघाला जाती-धर्माने विभागले होते त्या मतदारसंघात प्रेमाचा संदेश घेऊन मी निवडणुक प्रचाराची सुरुवात करीत आहे. माजी मंत्री असताना इथल्या स्थानिक आमदाराने झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राबविली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी निवडणुक प्रचार रॅलीत बोलताना केला.
0 Comments