मुंबई / महाराष्ट्र झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये महाराष्ट्रात धक्कादायक निकाल आले आहेत. भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात जनतेचा रोष असताना देखिल त्यांचे 100 टक्के उमेदवार जिंकले आहेत. यामुळे विरोधकच नाही तर सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. विदर्भात अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनाही पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा 13,131 मतांनी पराभव केला. पराभवानंतर बच्चू कडू यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला.
बच्चू कडू यांनी टीका करून भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. तसेच संविधान दिनी (26 नोव्हेंबर) लाँग मार्चची घोषणा केली आहे. ते म्हणाले की भाजपने केलेली लोकशाहीची हत्या आम्हाला मान्य नाही. लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम काढून टाकावे लागतील, असे ते म्हणाले. चांदुबाजार ते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणा त्यांनी केली. या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात भाजपने 133 जागांवर विजय मिळवला शिंदेसेनेने 57 जागांवर विजय मिळवला आहे तर अजित पवार यांच्या गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील कांग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना ठाकरे गटाने 20 जागांवर विजय मिळवाला आहे तर शरद पवार गटाने 10 जागां जिंकल्या आहेत. सपाला 2 जागा मिळाल्या आहेत. तर एक जागा एआयएमआयएमला मिळाली आहे.
महराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्ग्गज नेत्याचा पराभवाचा सामना करवा लागला. त्यामध्ये कांग्रेसचे बाळासाहेब थोरात, मनसेचे अमित ठाकरे, शिंदेसेनेचे सदा सरवणकर, कांग्रेचे पृथ्विराज चौहान, शिंदेसेनेचे मिलिंद देवरा, शरद पवार गटाचे युगेंद्र पवार, धिरज देशमुख यांचा समावेश आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचा, तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर तर वसई मतदारसंघाचं सहा वेळा नेतृत्व केलेले हितेंद्र ठाकूर यांना यावेळी निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गडबडीची आशंका व्यक्त केली आहे.
0 Comments