खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

उबाठाचे उमेदवार केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे - ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे केदार दिघे यांच्यात हायव्होल्टेज लढत झाली. यात कोण बाजी मारणार हे निकालानंतरच कळेल. दरम्यान केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन करीत दारू आणि पैसे वाटप केल्या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे आणि दारू वाटपाची घटना मंगळवारी रोजी रात्री उशिरा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी एका वाहनातून 52 हजारांची रोकड जप्त केली. मात्र दिघे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शिंदेसेनेच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनुसार केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदीप शेडगे, रवींद्र शिनलकर यांच्यासह नऊ जण 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पहाटे 1. 45 ते 2 वाजण्याच्या सुमारास कोपरीतील अष्टविनायक चौकात आले होते. त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली 26 पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे.
त्याच वेळी भोसले यांच्यासह शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून कोपरी पोलिसांकडे तक्रार केली. भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 174 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी पोलिसांनी एका वाहनातून मद्याच्या 11 बाटल्या आणि 52 हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. रोकड आणि दारू असलेली मोटार ताब्यात घेतल्याचे सांगितले. या मोटारीमध्ये शासनाच्या वाहनाला असलेला अंबर दिवा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाला, असेही पोलिसांनी सांगितले.

सत्ताधारी घाबरले असून, माझी गाडी मी स्वतःहून पोलिस स्टेशनला नेल्यानंतर तपासणी झाली. त्यामध्ये काहीही सापडले नाही. असे असताना जाणीवपूर्वक माझे नाव गुन्ह्यामध्ये समिविष्ट करून मला लक्ष्य केले जात आहे. कोपरी पाचपाखाडीत ज्यांनी पैशांचा महापूर आणला, जे साड्या वाटप करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, माझी गाडी तपासतानाच्या व्हिडीओत गाडीमध्ये काही सापडले नाही, तरीही जाणीवपूर्वक मंगळवारी रात्रीच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी गुन्हा दाखल होतो. यामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा हेतू आहे, असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools