आंबेडकरी चळवळीतील सहकारी मित्र- बांधवांनो, सप्रेम जयभीम
मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहोत.
पक्ष-संघटना, नेतृत्व बाजूला ठेऊन सामाजिक जबाबदारीची जाण म्हणून निळ्या धमचक्रांकीत ध्वजाखाली शेकडो आंदोलन, मोर्चे, धरणे करून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीचे अस्तित्व दाखविले आहे.
मी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
आजवर आपण एकजुटीने सर्व आंदोलने पार पाडली या लढ्यात आपली सर्वांची साथ मला महत्वाची आहे. तरी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष, संघटना, मित्रमंडळी, संस्थाच्या वतीने आपण मला साथ द्यावी.
मी सदैव आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहील याची ग्वाही देतो.
घेऊन निळा हाती, निष्ठेची निळ माथी
आंबेडकरी चळवळीतला साथी,
आपला
सचिन अशोक निकम
0 Comments