खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भिमाई प्रतिष्ठान वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन

छ संभाजी नगर ( औरंगाबाद प्रतिनिधी - विशाल पठारे ) 

विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कार्यास गती देणे व ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत.

जय भीम ! जय संविधान !! जय भारत !!!

हे निवेदन या प्रकारे वरील विषयी विनम्रपूर्वक विनंती करण्यात येते की, विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भडकल गेट येथे स्थित पुतळा हा समस्त भारतीय नागरिक तसेच आंबेडकरवादी विचारांच्या नागरिकांसाठी अस्मितेचे प्रतिक आहे. सध्या संबंधित पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे.

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु, यावर्षी स्मारकाचे काम अपूर्ण असल्याने पर्यायी अभिवादनाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने मूळ पुतळ्याच्या जवळच तात्पुरत्या स्वरूपात पुतळ्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. याद्वारे प्रशासनास विनंती करण्यात येते की,

१) तात्पुरत्या स्वरूपातील पुतळा : ६ डिसेंबरपर्यंत भडकल गेट परिसरात बाहेरच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती तात्पुरता पुतळा बसवण्यात यावा. प्रशासनाद्वारे शक्य नसल्यास तात्पुरता पुतळा बसवण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी.

२) सुशोभीकरण :- पर्यायी तात्पुरता पुतळ्याच्या सभोवतालचे क्षेत्र यथोचित सुशोभित करावे. यामध्ये स्टेज, लाइट्स, फुलांची आरास इ. समाविष्ट असावे. पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यासाठी मजबूत शिडीची व्यवस्था करण्यात यावी.

३) वाहतूक नियोजन :- ६ डिसेंबर रोजी मोठ्या गर्दीमुळे वाहतुकीचा बोजवारा उड्डू नये यासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात यावी. पार्किंग व्यवस्था मूळ पुतळ्यापासून दूर ठेवण्यात यावी.

४) कार्यक्रमाचे आयोजन : भडकल गेट परिसरात अभिवादन व अन्य संबंधित कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योग्य नागरी सुविधा पुरवण्याचे नियोजन करण्यात यावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असलेल्या भावनांचा आदर राखण्यासाठी आणि नागरिकांच्या भावनांना सन्मान देण्यासाठी वरील सूचनांवर सकारात्मक कृती करावी, अशी याद्वारे नम्र विनंती करण्यात येत आहे. आपण विनंती अर्जावर त्वरित कार्यवाही करून संबंधित विभागांना आदेश पारित कराल असा संकल्प आम्ही बाळगतो.

यावेळी डॉ. विनीत कोकाटे, इंजि. रामानंद ताडवे, शेख रजिया, इंजि. शैलेश चाबुकस्वार, संदिप बोराडे, योगिता वैष्णव इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools