जव्हार: विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, कुणाच्या काही अडचणी असल्यास त्या सोडविण्याकरिता आमदारांची प्रत्यक्ष भेट व्हावी या अनुषंगाने गुरुवारी सकाळी ११ वाजता जव्हार शहरातील साकी नाका, सेल्वास मुख्य रस्त्याला आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या जव्हार येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
हे कार्यालय आपल्या सर्वांच्या विचारधारेचे, समर्पणाचे आणि सेवा भावनेचे प्रतीक आहे. या नवीन मंचावरून आम्ही जनतेच्या हितासाठी, विकासासाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन पावले उचलणार आहोत.मतदार संघातील आरोग्य. दळणवळण रोजगार,शिक्षण, स्थलांतर. पिण्याच्या व शेती साठी पाण्याची व्यवस्था तसेच आदिवासी व बहुजन समाजासाठी लोकाभिमुख सेवा या कार्यालयाच्या माध्यमातून उप्लब्ध करून देण्यासाठी शक्य तेवढे प्रामाणिक प्रयत्न करीन असे जाहीर वचन आजच्या सेवा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देतो असे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाय विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मला भरघोस मताधिक्याने स्वीकारले आहे ही बाब माझ्या नेहमीच ध्यानात राहते त्यामुळे या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याकरिता मी माझे सर्वपक्षीय सहकारी तथा प्रशासकीय अधिकारी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने करेन असेही भोये यांनी बोलताना सांगितले.
या वेळी पालघर जिल्हा भाजपा, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, माजी आमदार श्रीनिवास वनगा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे, तसेच भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, भोये यांचे निकटवर्तीय तथा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून जव्हार पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन केले असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी किशोर मानभाव यांनी दिली.
0 Comments