न्यूज़ 24 खबर
प्रतिनिधी रेहान शेख
जव्हार : सोमवार पासून कोसळणाऱ्या संतत धारेने
जव्हार तालुक्यातील झाप रस्त्यावर असणाऱ्या पोंढीचा पाडा येथील कमी उंचीच्या पुलाहून पाणी वाहू लागल्याने या मार्गावर असणाऱ्या अनेक गाव पाड्यांचा संपर्क तुटला असून रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा सुरू झाला आहे.
पोंढीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून निरनिराळ्या स्तरातून मागणी केली जात आहे.परंतु प्रशासन केवळ टोलवाटोलवी ची उत्तरे देत तांत्रिक अडचणी सांगत असल्याची माहिती येथील महिलांनी सांगितले.
या मार्गावर ५ ग्रामपंचायत,१ प्राथमिक आरोग्य केंद्र,८ पथके,२ आश्रम शाळा,३५ जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकाची व विद्यार्थ्याची शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत.गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.
या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल? डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय? अशी शंका या भागातील वृध्द नागरिक करीत आहेत.
२३ जुलै २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार,तहसीलदार कार्यालय जव्हार,गटविकास अधिकारी पंचायत समिती,यांना पोंढीचा पाडा येथील
पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले होते मात्र त्यावर अजून काहीही उपाययोजना झाली नसल्याचे येथील वृद्ध नागरिक बोलतात.
पोंढीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे.परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा मुळे येथील जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे.
पायाभूत सुविधेकरिता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही?
एकनाथ दरोडा सरपंच झाप यांनी आमचे प्रतिनिधी यांना सांगितले.
0 Comments