खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

लोकशाही सत्ताधाऱ्यांची रखेल तर निवडणूक आयोग गुलाम, जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार हल्लाबोल

ठाणे/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह निवडणूक आयोग कशा प्रकारे मतदारांच्या मताची चोरी करून बनावट मतदार मतदान करत आहेत, याचा पर्दाफाश केला. यानंतर एनसीपी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आपली लोकशाही सत्ताधाऱ्यांची रखेल झाली असून निवडणूक आयोग गुलाम झाले आहे, असा शब्दात आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर जबरी टीका केली आहे. निवडणूक आयोग हे चोर असून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी लोकशाहीची वाट लावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी केला आहे.

आदेश श्रीवास्तव यांनी चार वेळा केलेले मतदान, सत्तर वर्षीय वृध्देने पहिल्यांदा मतदार म्हणून केलेले मतदान यासारखे अनेक पुरावे देत राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत 60 ते 70 जागांची हेराफेरी केल्याचे आरोप निवडणूक आयोगावर केले आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी महाराष्ट्रातील फुटलेल्या आमदारांना पंखाखाली घेऊन त्यांना पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण दिल्याचा आरोप केला. तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव यांनी महाराष्ट्र सरकार वाचविण्याचे काम केले असून संविधानाला पायदळी तुडविण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. 
निवडणूक याद्या, सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. निवडणूक आयोगानेच लोकसभा निवडणुकीत पाडण्याचे आणि जिंकविण्याचे काम केलेले आहे. शेवटच्या तासाभरात ७६ लाख मतदान कसे वाढले यांची माहिती दिली जात नसून चिखली मतदार संघातील सर्वेक्षणात मतदार यादीतील सहा हजार माणसे गावातच राहत नसून लाखो मतदारांची नावे अर्धवट आहेत. कोर्टातही न्याय मिळत नसून सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई यांनी उघड्या डोळ्यानी नीट बघून निवडणूक आयोगाच्या या गोंधळाबाबत हस्तक्षेप करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. ते म्हणाले कि मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाले आहे, ज्यामुळे मतांची चोरी शक्य आहे. सायंकाळी 5 नंतर मतदारांची संख्या का वाढते निवडणूक आयोग त्याचे उत्तर का देत नाही? ते म्हणाले की आयोग भाजपसाठी मते चोरत आहे. 

राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला आणि त्यांच्याकडे याचे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. ते म्हणाले की योग्य लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे का की बनावट मतदार यादीत समाविष्ट केले आहेत? जेव्हा मतपत्रिका वापरून मतदान केले जात होते तेव्हा संपूर्ण देश एकाच दिवसात मतदान करत असे. पण आता ईव्हीएम वापरून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मतदानाचे पाच टप्पे आहेत आणि ते पूर्ण होण्यास एक महिना लागतो. 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आमची युती जिंकते पण विधानसभा निवडणुकीत पराभव होतो. आम्ही निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार यादी मागितली, पण आयोग देण्यास तयार नव्हता. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णय घेतला जो आश्चर्यकारक होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही आमची चौकशी सुरू केली, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार कुठून आले? लोकसभेत एक निकाल, विधानसभा निवडणुकीत वेगळा निकाल, हे कसे घडले? याचे उत्तर मिळाले नाही. यामुळे मतचोरीचा आमचा संशय बळावला.

राहुल गांधी म्हणाले कि महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 100250 मतदानाची चोरी झाली. डुप्लीकेट मतदार, दुबार मतदान, पत्ता नसलेले मतदार, ज्यात एकाच ठिकाणी अनेक मतदार राहत असलेले दाखवले गेले, गुरकिरतसिंह नावाच्या मतदाराने चार वेगवेगळ्या पोलिंग बूथवर चार वेळा मतदान केले. असे मतदान हजारो नागरिकांनी केले. असेच प्रकार वाराणसीमध्येही झाले. आदित्य श्रीवास्तव याने दोनवेळा मतदान केल्याचे दिसून येते. कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यात या मतदाराचे नाव आहे. अशी हजारो नावे सापडली, असा दावा राहूल गांधी यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools