२,३७,४०,०००/-रू. कि.चा रकिलो ३७४ ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा (विड्स) व १,४७,०००/- रू. कि. च्या MDMA / ECSTASY च्या एकुण १९ टॅबलेट्स असा एकुण २,३८,८७,९५०/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केलेबाबत "
मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांनी अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करण्या संदर्भात आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. श्री. पंजाबराव उगले, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे श्री. अमरसिंह जाधव यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे श्री. विनय घोरपडे यांच्या सुचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के यांनी विशेष मोहिम राबविली होती.
सदर मोहीमेअंतर्गत पोहवा / अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार मा. वरिष्ठांचे परवानगीने सापळा कारवाई केली असता दिनांक २४/०८/२०२५ रोजी रात्रौ चे सुमारास सिम्बॉयोसीस शाळेच्या समोर, बायपास रोड, जुना टोलनाक्या जवळ, मुंब्रा, जि. ठाणे याठिकाणी आरोपी सुमित राजुराम कुमावत, वय २१ वर्षे, धंदा बेकार, रा.ठि. बोरिवली, मुंबई मुळ रा. जैसलमेर, राजस्थान याचे ताब्यात २,३७,४०,०००/-रू. किंमतीचा २ किलो ३७४ ग्रॅम वजनाचा 'हायब्रीड गांजा/ विड्स' व १,४७,०००/-रू. किंमतीच्या एकुण १९ MDMA/ECSTASY (methylene dioxy methamphetamine) टॅबलेट्स हा अंमली पदार्थ असा एकुण २,३८,८७,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल विक्रीकरीता बाळगताना मिळुन आला. सदर इसमाविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा नोंद कमांक १४०८/२०२५ एन.डी.पी.एस कायदा कलम १९८५ चे कलम कलम ८ (क), २० (ब) ii (ब), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवुन त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली असन त्याची दिनांक ०४/०९/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि/राजेंद्र निकम, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे हे करीत आहे.
यातील अटक आरोपीत याने सदरचा अंमली पदार्थ कोणाकडुन आणला? याबाबत तपास चालु आहे. तसेच हायब्रीड गांजा व MDMA टॅबलेट्स हा अंमली पदार्थ विदेशातुन भारत देशात तस्करी करून आणण्यात येतो, सदर गुन्हयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता असुन त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के, सपोनि / निलेश मोरे, सपोनि /सोमनाथ कर्णवर - पाटील, पोउपनि/राजेंद्र निकम, पोउपनि/दिपक डुम्मलवाड, पोहवा / शिवाजी रावते, पोहवा / हरीष तावडे, पोहवा/संदीप चव्हाण, पोहवा/अभिजीत मोरे, पोहवा / अमोल पवार, पोहवा/अमोल देसाई, पोहवा/हुसेन तडवी, पोहवा/अजय सपकाळ, पोहवा/अमित सपकाळ, पोहवा/नंदकिशोर सोनगिरे, पोहवा/गिरीष पाटील, पोशि/आबाजी चव्हाण, चापोना / अनुप राक्षे, मपोहवा / शिल्पा कसबे, मपोशि / कोमल लादे यांनी केली आहे.
ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल
0 Comments