खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

कोल्हापूर येथे वंचित बहुजन आघाडीची पदवीधर मतदार नोंदणी मोहिम; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते सुरुवात! ‎ ‎

कोल्हापूर : हातकणंगले येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख उपस्थित होते. ‎

आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेची सुरुवात या मेळाव्यातून करण्यात आली. खास तयार केलेल्या लिंकद्वारे https://tinyurl.com/us28bjvn स्वतः नोंदणी करून प्रकाश आंबेडकर यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. ‎ ‎सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी या लिंकच्या माध्यमातून तात्काळ नोंदणी करावी. ‎
‎पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांच्या निष्क्रियतेवर टीका करताना “तरुणांची बेरोजगारी, उद्योगधंद्यांपुढील अडचणी, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि नोकरभरतीतील विलंब या सर्व बाबींवर महायुती व महाविकास दोन्ही आघाड्या निष्प्रभ ठरल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत पदवीधरांनी वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी” असे आवाहन पदवीधर विकास मंचाचे समन्वयक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी केले. ‎ ‎

या कार्यक्रमाला अंजलीताई आंबेडकर, राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. नितीन धेपे, डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, डॉ. धैर्यवर्धन फुंडकर, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड गर्दीत पार पडलेल्या या मेळाव्यातून आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची सज्जता आणि जनतेत वाढलेला उत्साह दिसून आला.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools