दि. ०३/०९/२०२५ रोजी मा. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. प्रसाद सर्व साहेब, सहआयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, साहेब, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे, मा. श्री. प्रविण तांबे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे, श्री. वैद्य साहेब, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे, श्री. पोकळे साहेब, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नवी मुंबई, श्री. ए.डी. देशमुख, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली
खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील (गोवा) मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने खारेगाव ते ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर, खारेगाव, ता. जि. ठाणे
दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दारूबंदी गुन्हयाकामी गस्त घालत असताना सुमारे ०६:२० वाजता टाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहाचाकी टेम्पो क्र. DD-०१-A-९०१७ या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवुन त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्यातील भा.ब.विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजि. क्र. १७०/२०२५, दिनांक ०३/०९/२०२५ नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एकूण १४०० बॉक्स परराज्यातील भा.ब.विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) चे दारूबंदी गुन्हयाअंतर्गत जप्त केले. तसेच सदर गुन्हयामध्ये टाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहाचाकी टेम्पो क्र. DD-०१-A-९०१७ वाहनासह असा एकूण रू. १,५६,६३,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे मोहम्मद समशाद सलमानी (वाहनचालक) यास अटक केली आहे.
सदर कारवाई श्री. एम.पी.धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे, श्री. एन.आर.महाले, दुय्यम निरीक्षक, श्री.एस.आर.मिसाळ, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे, श्री.बी.जी.थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री.पी.एस.नागरे जवान,
श्री.पी.ए. महाजन जवान, श्री.व्हि. के. पाटील जवान, श्रीमती एस.एस. यादव महिला जवान, श्रीमती पी.पी. पाटील महिला जवान, श्री. एम.जी.शेख, जवान नि वाहनचालक इत्यादीसह हजर आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास श्री. प्रविण तांबे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. महेश प्रकाश धनशेट्टी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १, ठाणे हे करीत आहेत.
ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल
0 Comments